संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये वीर पत्नी सरला अमोल जाधव यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये वीर पत्नी सरला अमोल जाधव यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

कोपरगाव/वेबटीम:- भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शहीद जवान अमोल जाधव यांच्या वीर पत्नी सरला जाधव य...

कोपरगाव/वेबटीम:-


भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शहीद जवान अमोल जाधव यांच्या वीर पत्नी सरला जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट संचलन करीत मानवंदना दिली व देशभक्ती पर नाटिका व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला वीस ते पंचवीस माजी सैनिक उपस्थित असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नवचैतन्य पसरल्याचे दिसून आले. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे,सदस्य विनोद थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात तिरंगी फुग्यांनी अत्यंत सुंदर सजावट केल्याने सर्व पाहुण्यांनी व पालकांनी शाळेचे कौतुक केले. वरद तारोडी व भक्ती देवडे या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेच्या शिक्षिका वसुधा झावरे यांनी प्रास्ताविक केले,प्रियांका शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,प्रणित गंडे व शिक्षक तुषार बागल यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रियांका सोनवणे यांनी मानले. 



या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर,सदस्य पोपट झुरळे,कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे,ॲड.शंकर यादव,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भाबड,रामदास केकाण,शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,दिलीप सोनवणे,भाऊसाहेब जाधव,संतोष झावरे,भूषण वडांगळे, सतीश शिंगाने,माजी सैनिक संघटनेचे सदस्य,पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.



1 टिप्पणी

  1. The Emperor Casino | Play Now | Shootercasino.com
    In addition to the casino, you can choose between different febcasino games from different online casinos in 샌즈카지노 a casino. With different limits, 제왕 카지노 you can play for real money or for free.

    उत्तर द्याहटवा