डॉ.तनपुरे साखर कारखान्यात जिल्हाधिकारी नियुक्त समितीकडून वजन-काटे तपासणी सर्व वजन-काटे बरोबर असल्याचा अहवाल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.तनपुरे साखर कारखान्यात जिल्हाधिकारी नियुक्त समितीकडून वजन-काटे तपासणी सर्व वजन-काटे बरोबर असल्याचा अहवाल

राहुरी(वेबटीम)  डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हाधिकारी नियुक्त समितीने अचानक भेट देऊन कारखान्याच्या वजन काट्यांची तपास...

राहुरी(वेबटीम)


 डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हाधिकारी नियुक्त समितीने अचानक भेट देऊन कारखान्याच्या वजन काट्यांची तपासणी केली आहे. सदर पथकाने या कारखान्याचे सर्व वजन काटे तंतोतंत बरोबर असल्याचा अहवाल दिला असून यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


        जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये 19 जानेवारी रोजी डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास वजन काटे तपासणीसाठी जिल्हाधिकारी नियुक्त पथकाने अचानक भेट देऊन या कारखान्याच्या वजन काट्यांची तपासणी  केली.



 विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 राजेंद्र देशमुख यांच्या अधिपत्याखाली सदस्य सचिव तथा उपनियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाचे एन.पी.उदमले यांच्यासह पथकाचे सदस्य तथा निरीक्षक वैधमापन शास्त्र विभाग राहुरीचे एस. ए. चित्ते यांचा या पथकात समावेश होता. या पथकाने वे ब्रिज वरून ज्या गाड्या उसाचे वजन करून गेल्या होत्या. त्यापैकी तीन गाड्या परत मागे बोलावून त्याची वजन पावत्यानुसार व प्रत्यक्ष दर्शविल्या नुसार वजन तपासण्यात आले. या पथकाला प्रत्यक्षात आलेले वजन व पावत्या त्यावरील वजन बरोबर आढळून आले.  


सदर ठिकाणी असलेल्या आणखी पाच वाहनांचे वजन काट्यावर मोजण्यात आले .तेदेखील तंतोतंत बरोबर असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आल्याने सदर कारखान्याचा काट्यांमध्ये कोणत्याही प्रकारे दोष नसल्याचे सिद्ध झाले असून सदर पथकाने पंचासमवेत काटे तपासणी केलेली आहे व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला असल्याचे पथकाचे प्रमुख राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत