राहुरी कारखाना(वेबटीम) राहुरी कारखाना येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना वसाहत येथे राहुरी तालुका चर्मकार विकास संघ व देवळाली प्रवरा प्राथमिक ...
राहुरी कारखाना(वेबटीम)
राहुरी कारखाना येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना वसाहत येथे राहुरी तालुका चर्मकार विकास संघ व देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड लसीकरण कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
चर्मकार विकास संघाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास सोनवणे व दिनेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या कॅम्पचे उद्घाटन राहुरी तालुकाध्यक्ष सुरेखाताई देवरे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी राहुरी तालुका उपाध्यक्ष स्मिता माने, सचिव कल्पनाताई खामकर, सहसचिव सुमनताई सोनवणे, अहमदनगर उत्तर विकास उपाध्यक्ष विठ्ठल देवरे,सहसचिव कैलास वाघमारे, राहुरी तालुकाध्यक्ष किरण घनदाट, तसेच मोनाली सोनवणे, विजया वाणी, रिकी गाडीलोहार आदि उपस्थित होते.
कॅम्प यशस्वितेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे विजय बाविस्कर, श्री.बाबीस्कर संगीता पंडीत, रेखा पंडित, सुलेखा शेख, आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत