नगर विशेष प्रतिनिधी-: दि.15/01/2022 रोजी माननीय श्री. बी. जी. शेखर सो, विशेष पोलीस महानिरीक्षक सो, नाशिक परिक्षे...
नगर विशेष प्रतिनिधी-:
दि.15/01/2022 रोजी माननीय श्री. बी. जी. शेखर सो, विशेष पोलीस महानिरीक्षक सो, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी अहमदनगर जिल्हा वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने मा. श्री. मेघश्याम डांगे पोलीस उप भरोसा सेल उल्लेखनीय कामाचे आयजी कडून कौतुक अधीक्षक सो (गृह ) यांच्या समवेत भरोसा सेल या ठिकाणी भेट दिली.
भरोसा सेल च्या कामाबद्दल माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेत असतांना भरोसा सेलने सण 2021 मध्ये एकूण 2183 तक्रारी अर्जापैकी 789कुटुंबामध्ये समुपदेशन करून समझोता घडवून आणला. भरोसा सेल ने 789 विभक्त झालेले कुटुंब पुन्हा नव्याने एकत्र जोडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल भरोसा सेल येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस देण्याबाबत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक यांनी सूचित केले. तसेच भरोसा असेल येथून समझोता होऊन गेलेल्या उस्फुर्त जोड्यांनी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आपला भरोसा येथील चांगला अनुभव की," आम्हास इतर कुठल्याही ठिकाणी न्याय न भेटता खरा न्याय भरोसा सेल येथे मिळाला आहे. " असे सांगून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक यांच्यासमक्ष भरोसा सेल ने केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत