देवळाली प्रवरातील वैद्यकीय अधिकारी मासाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांची त्रिसदस्यीय सदस्य समिती चौकशी करणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील वैद्यकीय अधिकारी मासाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांची त्रिसदस्यीय सदस्य समिती चौकशी करणार

देवळाली प्रवरा(वेबटीम):-                   देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला हकलून देऊन तिचे बाळंतप...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-



                 देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला हकलून देऊन तिचे बाळंतपण रस्त्यावर झाल्याने या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.संदिप सांगळे यांनी या घटननेची तिन सदस्य समितीव्दारे चौकशी करुन पाच दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. माञ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भागवत दहीफळे यांना आज सायंकाळपर्यन्त वैद्यकीय अधिकारी मासाळ यांची उचलबांगडी करण्यात यावी अन्यथा मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकणार आहे. असा इशारा आ.कानडे यांनी दिला होता.जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.संदिप सांगळे यांनी आ.कानडे यांच्या तोंडाला पाने पुसुन येथिल वैद्यकीय अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता केवळ चौकशीचा फार्स निर्माण केला आहे.



                   देवळाली प्रवरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुरी फँक्टरी येथिल कोमल अरुण शिंदे (वय- ३०) ही महिला बाळंतपणासाठी आली असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी हकलून लावले. आरोग्य केंद्रापासून अवघ्या ३०० फुटावर रस्त्यावर तिचे बाळंतपण झाल्याने देवळाली प्रवरात हा  निंदनीय प्रकार घडल्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला होता.या घटनेची दखल घेवून आ.लहू कानडे व माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पिडीत महिलेची विचारपूस केली.त्यानंतर येथिल वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.अतिरीक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डाँ.भागवत दहिफळे यांना आ.कानडे यांनी  येथिल वैद्यकीय अधिकारी मासाळ यांना शुक्रवारी सायंकाळ पर्यंत येथुन हलवा किंवा सक्तीच्या रजेवर पाठवा असे सांगितले असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.संदिप सांगळे तिन सदस्य समिती चौकशी साठी नेमली आहे.या समितीमध्ये जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डाँ प्रकाश लाळगे, सार्वजनिक आरोग्य परीचारीका संदिप काळे, राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डाँ.दिपाली गायकवाड आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. डाँ.मासाळ यांना माञ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले नसल्याने आ.कानडे यांनी केलेल्या मागणीला पाने पुसण्यात आली.डाँ.मासाळ यांनी माञ कारवाई होण्यापूर्वीच रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.वैद्यकीय रजा घेतली असल्याचे समजते.



              वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांची चौकशी करण्यासाठी पाच दिवसाची मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी उशिरा जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ संदिप सांगळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पिडीत मातेची विचारपूस केली.वैद्यकीय अधिकारी मासाळ व परीचारीका यांची चौकशी केली असल्याचे समजते.चौकशी समिती मधील तालुका आरोग्य अधिकारी डाँ. दिपाली गायकवाड  यांनी घटनेच्या दिवसा पासुन बाळंतपणास आलेल्या महिलेला व तिच्या पतीला दोषी धरुन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परीचारीका यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे.पिडीत महिलेचा पती दारु पेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. त्यामुळे महिलेस दाखल करुन घेतले नाही.असे स्पष्टीकरण आ.कानडे यांच्या समोर दिले. वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांना त्या महिलेचे बाळंतपण करायचे होते का?तिच्या पतीचे बाळंतपण करायवयाचे होते असा सवाल यावेळी उपस्तथित नागरीकांनी डाँ.गायकवाड यांना करताच त्यांनी गप्प बसण्याची भुमिका घेतली.चौकशी समितीत डाँ.गायकवाड यांची नियुक्ती केल्याने चौकशी होण्यापूर्वीच चौकशी अहवाल संशयाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. त्यामुळे चौकशी समितीत अन्य दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.


*व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल*

  चौकशी समितीचा फार्स निर्माण करुन आ.कानडे यांच्या मागणीकडे जिल्हा आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. वैद्यकीय अधिकारी मासाळ वैद्यकीय रजेवर असले तरी ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात शनिवारी दिवसभर दिसत होते. त्या महिलेवर वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांनी दबाव आणून आम्ही सांगतो तसाच जबाब द्यायचा आहे. जर बदलला तर तुझ्यावर चुकीचा औषधोपचार करण्यात येईल असे तीला सांगितल्याने आ.लहू कानडे व माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर घुमजाव केले असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शुक्रवारी सायंकाळी व्हायरल करण्यात आला आहे.


*..तर २६ जानेवारीला आत्महदहन*

                    प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परीचारीका यांचे निलंबन न केल्यास 26 जानेवारी रोजी रिपाईचे कार्यकर्ते आत्मदहन करणार असल्याचे सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत