कोपरगाव/वेबटीम:- १५ जानेवारी हा दिवस भारतीय सैन्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु...
कोपरगाव/वेबटीम:-
१५ जानेवारी हा दिवस भारतीय सैन्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु फार कमी लोकांना या दिवसाचे दिन विशेष माहित आहे. संत ज्ञानेश्वर स्कूल मधील विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी लष्कर दिन माजी सैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे ठरवले व तसेच माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के सवलत व शाहिद जवानांच्या मुलांना नर्सरी ते दहावी मोफत शिक्षण देणार असल्या बाबत चे पत्र माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे साहेब यांच्या कडे सुपुर्द केले. सर्व माजी सैनिकांचे संस्थेच्या वतीने स्वागत करून औक्षण करण्यात आले.
लष्कर दिनानिमित्त भारत मातेची सेवा करत असतांना शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शाळेचे प्राचार्य सचिन मोरे यांनी सर्व माजी सैनिकांचे स्वागत केले तसेच त्यांनी केलेल्या देश सेवेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षिका वैशाली लोखंडे व वसुधा झावरे यांनी लष्कर दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले. या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर नाटिका सादर केली. संस्थेच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
माजी सैनिकांनी भारत मातेच्या
व भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या सेवेचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही. असे असतांना त्यांना सेवा निवृत्ती नंतर अनेक शासकीय कामांना अडचणी येणे हे दुर्दैवच असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर यांनी आपल्या भाषणातून नमूद केले.
माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे व विनोद थोरात यांनी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के सवलत दिल्या बद्दल संस्थेचे आभार मानले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त विक्रांत झावरे, विशाल झावरे,शंकर यादव व शाळेचे क्रिडा शिक्षक अनुप गिरमे यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी सैनिक बाळासाहेब वाघ,मधुकर इनामके,सुभाष क्षीरसागर, पंकज झावरे, रावसाहेब मोरे, दत्तात्रय गावीत्रे, भाऊसाहेब निंबाळकर, गणेश रक्ताटे व रामनाथ वर्पे कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वसुधा झावरे यांनी केले तर आभार मयुरी भोसले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत