राहुरी तालुक्यातील सुमारे ३५ शिव रस्ते महिनाभरात खुले करण्याचा तहसीलदार एफ आर शेख यांचा संकल्प! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील सुमारे ३५ शिव रस्ते महिनाभरात खुले करण्याचा तहसीलदार एफ आर शेख यांचा संकल्प!

देवळाली प्रवरा/वेबटीम:- महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजस्व अभियान तसेच महसूल विजय सप्तपदी अभियान अंतर्गत राहुरी तालुक्यातील सुमारे पस्तीस शिव...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजस्व अभियान तसेच महसूल विजय सप्तपदी अभियान अंतर्गत राहुरी तालुक्यातील सुमारे पस्तीस शिव रस्ते येत्या महिनाभरात खुले करण्याचा निर्णय राहुरी चे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी घेतला आहे.




  राहुरी तालुक्यातील नकाशावर दाखवलेले मात्र अनेक वर्षानुवर्षे अतिक्रमणामुळे बंद झालेल्या शिव रस्त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व इतरांना आपला शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवणे किंवा शेती मशागतीसाठी यंत्रसामग्री शेतात  येण्यासाठी जिकरीचे ठरत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांनी सदर रस्ते खुले करण्याची मागणी केली आहे.परंतु रस्त्याच्या कडेला असलेले शेतकरी यांच्या हद्दीवरून एकमत होत नसल्याने बरे शेतकऱ्यानीं अतिक्रमण केले आहे त्यामुळे रस्ता खुला करण्यासाठी अतिक्रमण धारक तयार नाही.     

मात्र आता यासाठी भूमिअभिलेख राहुरी, पोलीस स्टेशन राहुरी व तहसील कार्यालय राहुरी यांच्यामार्फत संयुक्तिक रित्या मोजणी करून हद्द व खुणा निश्चित करून रस्ते खुले करण्यात येणार आहेत. सदरचे रस्ते हे शासकीय रस्ते असून तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अनेक रस्त्यांच्या वादाच्या रस्त्याव्यतिरिक्त आहेत. या रस्त्यांचे नकाशे उपलब्ध असल्याने याबाबत कुठलाही खटला न चालवता नकाशा प्रमाणे खुणा करून राहुरी तहसील अंतर्गत चे ३५ रस्ते येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे यासाठी महिनाभर अभियान राबवले जाणार असून दिनांक ३ जानेवारी  ते १७फेब्रुवारी २०२२ पर्यंत तालुक्यातील हे सर्व शिव रस्ते खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती राहूरीचे तहसीलदार  एफ आर शेख यांनी दिली आहे. 

तहसीलदार शेख यांचा धाडसी निर्णयावर शेतकरी व ग्रामस्थ खुश!

गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर अतिक्रमण करून काही लोकांनी शेतकऱ्यांचे येणे जाणे जिकरीचे केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कसने अवघड झाले आहे, मात्र आता शिव रस्ते खुले झाल्यावर शेतीची मशागत व तयार शेतीमाल बाजारपेठेत पोचवणे सोपे होणार असल्याने या अभियानाचे राहुरी तालुक्यातून उस्फुर्त स्वागत होत असून राहुरीच्या तहसीलदार एफ आर शेख यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शेतकऱ्यांनी कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत