देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सर्वच समाजाचे कष्टकरी शेतकरी आहेत. पाऊस व्यवस्तित झाल्यामुळे यावर्षी त...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सर्वच समाजाचे कष्टकरी शेतकरी आहेत. पाऊस व्यवस्तित झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात २०-२२ लाख टन ऊस ऊभा आहे. परंतु सर्वसामान्य शेतकर्यांना याचा फायदा होण्याऐवजी तो भरडला जात आहे ही दुखःद व चिड आणणारी बाब आहे. असे आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
थोरात पुढे म्हणाले की , अहमदनगर जिल्ह्यातील कुप्रसिध्द सोयरेशाही राहुरी तालुक्यांतील गोरगरीब शेतकर्यांचा गळा घोटत आहे. सर्वच साखर कारखाने पिढ्यानपिढ्या विशिष्ट गटांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या काळात केवळ “ त्यांच्याच “ सोयर्यांचे ऊस गाळप होत आहे. बिगरसोयरेधारी बहुजन समाजातील गोरगरीब शेतकरी सुद्धा हताश झाले आहेत. आणिमग राजकिय आरक्षणासाठी टाहो फोडणारे इतर मागासवर्गिय व मागासवर्गिय शेतकऱ्यांचे हाल तर विचारायलाच नकोत.
रोज सकाळी हे “ नाहीरे” वर्गातिल हताश शेतकरी एखाद्या सोयऱ्याला विनंती करून नेत्यांच्या दारात आशाळभूतपणे हेलपाटे घालत आहेत. ऊसाला तुरे फुटल्यामुळे तोडीवाले “ तोंड” केल्याशिवाय थळात पाय ठेवायला तयार नाहीत. त्यांना पुढे करून मुजोर अधिकारी तर्र होत आहेत.” सर्व सत्ताधिश नेत्यांपुढे गोरगरीब हताश व लाचार झाले आहेत. सहकाराच्या नावाखाली चाललेला हा नंगानाच आणखी कीती दिवस सहन करणार ? गोरगरीबांच्या हिताचा सहकार कधीच संपला असून आता सोयरेशाहीचा जुलुमाचे सहकारक्षेत्र बनलेआहे. हे सहन केले जाणार नाही. यामधून होणारं सामाजिक विधटन भयावह असेल , गरज पडल्यास यांच्या वाड्यांसमोर निषेध केला जाईल असा इशारा सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत