देवळाली बंगला येथे महाप्रसाद वाटपाने श्री.गजानन विजय पारायण सोहळ्याची सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली बंगला येथे महाप्रसाद वाटपाने श्री.गजानन विजय पारायण सोहळ्याची सांगता

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळ आयोजित श्री.गजानन विजय पार...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळ आयोजित श्री.गजानन विजय पारायण सोहळ्याची मंगळवार दिनांक 11 जानेवारी रोजी महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने सांगता झाली

गेल्या १२ वर्षापासून देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने श्रीगजानन विजय पारायण आयोजित केला जातो. यंदाही कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पारायण सोहळ्यास आयोजित करण्यात आला. मंगळवारी महाप्रसाद वाटपाने पारायण सोहळ्याची सांगता झाली


श्रीराम मंडळाचे संस्थापक तथा हिंदु रक्षक धर्म परिषद चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुभुषण दत्ता गागरे, ज्ञानदेव कदम,  सुरेश कदम, संदिप कदम, अनिल मोरे, ज्ञानदेव कदम, भाऊसाहेब पवार, केशवराव चोळके, जयश्रीताई तांबे, पुष्पाताई तांबे, नंदाताई कदम, अलकाताई घाडगे, पुष्पाताई कदम आदिंसह भाविक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत