देवळाली प्रवरा/वेबटीम:- मकर संक्रांतीचा सण कोविड नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने व प्लास्टिक मुक्त साजरा करावा आणि वाण देताना आरो...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
मकर संक्रांतीचा सण कोविड नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने व प्लास्टिक मुक्त साजरा करावा आणि वाण देताना आरोग्यपुरक व स्वयंसहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान व वसुंधरा संवर्धनचे ब्रँड-अँबेसिडर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले आहे.
"माझी वसुंधरा" महत्वाकांक्षी योजनेत वसुंधरा संवर्धनासाठी गावामध्ये पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्रांती साजरी करण्यात यावी व यावर्षी गावातील प्रत्येक महिला भगिनींनी प्लास्टिक मुक्त मकरसंक्रांत साजरी करण्याचे संकल्प करावे. मकर संक्रातीला महिला वर्ग एकत्रित येऊन तिळगुळ समारंभ आयोजित करतात. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग एकमेकांना कौटुंबिक जीवनावश्यक व आरोग्यदायी वस्तूंची वाण म्हणून देवाण घेवाण करतात. वाण देताना आरोग्यपुरक व स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा वापर करावा, तसेच यासणाचे औचित्त साधून महिला भगिनींनी एकत्र येऊन "जिजाऊची लेक" असा ग्रुप स्थापन करून वसुंधरा संवर्धन व स्वच्छ भारत अभियान साठी जनजागृती करावे, असेही आवाहन शिवचरित्रकार श्री. हसन सय्यद यांनी केले आहे.
राहूरी तालुक्यातील आपल्या प्रत्येक गावात व देवळाली प्रवरा शहरात मकर संक्रातीच्या निमित्ताने महिलांचा एकत्रित कोविड नियमांचे पालन करून, मास्कचा उपयोग करून तिळगुळ समारंभ साजरा करावा. या वर्षीची मकर संक्राती पर्यावरणपूरक साजरी करताना स्थानिक महिला स्वयंसहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा (मास्क, कापडी पिशवी, सेंद्रिय हळद, सेंद्रिय गुळ, तीळ इ.) वापर करावा. या अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्रात सण साजरा करून या सणाचा गोडवा आणखी द्विगुणीत करावे, असे अवहान करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्राती साजरी करण्यासाठी राहूरी तालुक्यातील सर्व आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व कर्मचारी बांधवानी आप आपल्या स्तरावर पर्यावरण संवर्धन संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती करावे, असे आव्हानही शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत