कोपरगांव :- प्रतिनिधी कोपरगांव तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असुन तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांच्या ...
कोपरगांव :- प्रतिनिधी
कोपरगांव तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असुन तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेने कडाक्याच्या थंडीत रात्री दवाखान्यांच्या बाहेरच उघडयावरच बाळाला जन्म दिला ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी निर्दयी प्रवृत्तीची असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहता कोल्हे यांनी देवुन याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तकार करण्यांत आली आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, १२ जानेवारी रोजी रात्री चासनळी परिसरातील निवृत्ती रामचंद्र पवार यांच्या गर्भवती मुलीला त्रास होवु लागल्याने त्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला नेले, परंतु तेथील कर्मचा-यांनी सदर गर्भवती महिलेस दवाखान्यात दाखल करून घेतले नाही, शेवटी महिलेच्या वेदना असहय झाल्याने कडाक्याच्या थंडीत तिने चक्क उघडयावरच बाळाला जन्म दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी याप्रकरणी कुठलीही मदत केली नाही. शासन एकीकडे बेटी बचाव म्हणून नारा देत आहे मात्र दुसरीकडे तिच्यावर अन्यायाचे फटकारे मारून गर्भवती महिलेच्या हालअपेष्टा दुर्लक्षीत करून तिला बाळंतपणासाठी दवाखान्यांत दाखल करून घेतले जात नाही ही घटना मन सुन्न करणारी आहे. रात्री-अपरात्रीच्यावेळी असहय वेदना होणा-या महिलांना बाळंतपणांसाठी नकार देणां - या संबंधीत जबाबदार वैद्यकिय अधिका-यासह उर्वरित कर्मचा-यांची चौकशी होवुन त्यांचेवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत