राहुरी मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल होणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल होणार

  राहुरी(वेबटीम):- महानगरांच्या धर्तीवर शैक्षणिक सुविधा असलेल्या साधनांचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही व्हावा यासाठी नगरविकास राज...

 राहुरी(वेबटीम):-



महानगरांच्या धर्तीवर शैक्षणिक सुविधा असलेल्या साधनांचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही व्हावा यासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोठे प्रयत्न करून राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेला सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला मतदारसंघातील सुमारे ४१ गावातील जिल्हा परिषद शाळेला याचा लाभ मिळणार आहे सध्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी आपण प्रथमपासूनच प्रयत्नशील असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.



अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याकरिता प्रत्येकी २ लाख २० हजार रुपये किमतीचे ५० संच मंजूर करण्यात आलेले आहे सदरच्या शाळा डिजिटल झाल्यावर शाळेचा गुणवत्तेचा दर्जा व मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारून स्पर्धेच्या युगात तग धरून अधिक उंचावेल अशी आशा व्यक्त केली सध्याचे युग हे संगणकीकृत असल्याने दूरदृष्टी ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला होता त्याकरिता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे एक कोटी १० लाख रुपये निधीचा शालेय विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.


यात राहुरी बुद्रुक 4 कणगर 2 म्हैसगाव एक वांबोरी दोन तांदुळवाडी एक वळण एक कोंढवड दोन सोनगाव दोन धानोरे एक सात्रळ 3 तांभेरे एक कानडगाव एक वरशिंदे एक ताहराबाद 1 गुहा एक चंडकापूर एक केंदळ खुर्द एक केंदळ बुद्रुक 1   शिलेगाव एक तमनर आखाडा एक डिग्रस एक राहुरी खुर्द एक चेडगाव एक मोकळ ओहोळ एक सडे एक कापूरवाडी एक इमामपूर एक डोंगरगण एक मांजरसुंबा एक जेऊर एक ससेवाडी एक शेंडी एक पोखर्डी गावठाण 1 मिरी एक शिराळ एक कोल्हार कोल्हुबाई एक कामत शिंगवे एक शिरापुर एक सातवड एक करंजी एक डमाळवाडी एक असे एकूण पन्नास संच संबंधित शाळांना वितरित करण्यास सुरुवात झाली असल्याचेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.


शैक्षणिक क्षेत्रातही उच्चशिक्षित असलेले मंत्री तनपुरे यांनी आपले कार्य कौशल्य दाखवून  दाखवून दिले असल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी सांगितले व समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत