राहुरी(वेबटीम) राज्यातील धरणग्रस्त, भूमिहीन व कष्टकरी शेतकरी,महिला बेरोजगार, आदिवासी, प्रकल्प पीडित, अपंग, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार , ...
राहुरी(वेबटीम)
राज्यातील धरणग्रस्त, भूमिहीन व कष्टकरी शेतकरी,महिला बेरोजगार, आदिवासी, प्रकल्प पीडित, अपंग, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार , विधवा, अनेक समस्यांनी त्रस्त असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणग्रस्त सेवा संघ जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती धरणग्रस्त सेवा संघ महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अँड.सिंड्रेला परेरा यांनी दिली.
याबाबत बोलताना परेरा म्हणाल्या की, धरणग्रस्त, भूमिहीन व कष्टकरी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय व हक्कासाठी मागणी करत आहे.परंतु न्याय मिळत नसल्याने अडचणींचा सामना करण्याची वेळ गोरगरिबांवर आली आहे.
यासाठी धरणग्रस्त तसेच भूमिहीन शेतकरी,महिला बेरोजगार, आदिवासी, प्रकल्प पीडित, अपंग, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार , विधवा यांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणग्रस्त सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित याचिका दाखल करणार असून धरणग्रस्त व भूमिहीन शेतकरी यांनी न घाबरून जाता पुढे येऊन धरणग्रस्त सेवा संघाशी संपर्क करावा असे आवाहन अँड.सिंड्रेला परेरा यांनी केले असून आधिक माहितीसाठी 70585 65936 , 98819 52731, 9823337980(सागर सावंत) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत