आंबी (संदिप पाळंदे):- श्रीरामपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर यांनी ...
आंबी (संदिप पाळंदे):-
श्रीरामपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर यांनी बुधवारी (दि. १९) केसापूर येथील साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या कांदा चाळ प्रकल्पास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनी मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची कार्यकारी संचालक सुनिल साबळे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर सुरू केलेल्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. याकामी काही अडचण आल्यास जिल्हा बँकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यास प्रयत्नशील राहू असे मत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी 'साई-प्रवरा'चे सचिव तथा केसापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दादासाहेब मेहेत्रे यांनी करण ससाणे यांचा, संचालक रायभान जाधव यांनी सचिन गुजर यांचा तर कार्यकारी संचालक सुनिल साबळे यांनी श्री. पाउलबुद्धे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी माहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे श्री. धोंडे, श्री. आंधळे, साई-प्रवरा कंपनीचे अध्यक्ष संभाजी नान्नोर, उपाध्यक्ष नंदकिशोर मुसमाडे, संचालक कुंडलीक खपके, राजेंद्र वडितके, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष मेहेत्रे, लेखाधिकारी अमृत शिरसाठ, नवनाथ बोल्हे, राहुल टाकसाळ यांसह कंपनीचे सभासद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत