आरडगाव येथे ७ एकर परिसरात निर्मलधाम आश्रमाच्या विस्तारित पूजा हॉल बांधकामाचे भूमिपूजन संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगाव येथे ७ एकर परिसरात निर्मलधाम आश्रमाच्या विस्तारित पूजा हॉल बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

राहुरी(वेबटीम):- परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांचे परम कृपेतील जगातील पहिला ट्रस्ट व पहिला आश्रम दि लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबई संचलित ...

राहुरी(वेबटीम):-


परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांचे परम कृपेतील जगातील पहिला ट्रस्ट व पहिला आश्रम दि लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबई संचलित निर्मल धाम आश्रम, आरडगाव, ता.राहुरी, जि. अहमदनगर येथील ७ एकर परिसरात जागतिक स्तरावरील भव्य स्वरूपातील विस्तारीत पुजा हॉल बांधकामाचा भुमीपूजन व फीत कापुन उदघाटन समारंभ परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या ज्येष्ठ कन्या आदरणीय श्रीमती कल्पना दिदी यांचे शुभहस्ते सोमवार दिनांक १७.०१.२०२२ रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ सहजयोग्यांच्या उपस्थितित चैतन्य व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. 




जागतिक स्तरावरील या जागेतील भव्य पुजा हॉलमध्ये एकाच वेळी हजारो सहजयोगी   पुजेचा लाभ घेऊ शकतील अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध असलेले बांधकामाचे नियोजन करण्यात आलेले आहे.


सदर समारंभास ट्रस्टचे विश्वस्त, व्यवस्थापक, कार्यकारी मंडळ व महाराष्ट्राच्या विविध भागांतील सहजयोग केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम कोरोनाचे पार्श्वभूमीवर मर्यादित उपस्थितांमध्ये पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत