राहुरी फॅक्टरी येथील चंद्रकांत कराळे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील चंद्रकांत कराळे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चंद्रकांत रामकृष्ण कराळे यांची नुकतीच स्वाभिमानी मराठा महास...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-



राहुरी फॅक्टरी परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चंद्रकांत रामकृष्ण कराळे यांची नुकतीच स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.



मराठा  समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी  तसेच शेतकरी, विद्यार्थी व तरुणांचे संघटन करून त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून व्हावे या हेतूने चंद्रकांत कराळे यांची  स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले यांनी निवड केली आहे.


 या निवडीचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.सुभाष गागरे, निरीक्षक अंकुश डांभे, युवक प्रदेशाध्यक्ष रुपेश दळवी, राहुरी तालुकाध्यक्ष शरद खांदे आदींनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत