नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे- ढाकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे- ढाकणे

कोपरगाव प्रतिनिधी-  नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे अशा आशयाचे निवेदन गोदामाई प्रतिष्ठान चे ...

कोपरगाव प्रतिनिधी- 



नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे अशा आशयाचे निवेदन गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी तथा माजी अर्थ व गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी निवेदन देत केली आहे.


 गोदामाई प्रतिष्ठाणच्या वतीने ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरास अतिप्राचिन ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभलेला आहे. तसेच शहरातुन महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणारी पवित्र गोदावरी नदी वाहते. परंतु गोदावरीच्या उगमस्थान असलेल्या त्रंबकेश्वर पासून ते राजमंद्री म्हणजे समुद्राला मिळे पर्यंत जागोजागी नागरिक आपल्या घर, परिसरातील स्वच्छते नंतरचा कचरा, धार्मिक, देवदेवतांच्या खराब झालेल्या अनेक मूर्ती,फोटो इ. नदी मध्ये टाकुन प्रदुर्षण वाढीस एक प्रकारे भर घालतात. पवित्र गोदावरी नदी या प्रदुर्षणाच्या विळख्यातून सतत स्वच्छ व सुंदर वाहत राहावी या अनुषंगाने अनेक अडचणींचा सामना करत गोदामाई प्रतिष्ठाण गेल्या १४७ आठवड्या पासून नियमितपणे आणि सातत्याने आठवड्यातील दर शनिवारी कोपरगाव शहरातील छोट्यापुला जवळील गुरुशुक्राचार्य व गुरु कचेश्वर नदी घाट परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत तसेच नदी परिसर, शहरातील इतर मोकळ्या जागेत विविध देशी प्रजातीचे वृक्षारोपण व संवर्धन आणि  रेन वाटर हार्वेस्टिंग जनजागृती बाबत कार्य करत आहे.

तरी आपणास विनंती की, आम्ही आपल्या द्वारे महाराष्ट्राचे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पर्यंत पोहचून माझी वसुंधरा अभियाना अंर्तगत नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्पाची स्थापना करत गोदावरी नदीचे पुनर्जीवन व स्वच्छता मोहीम अखंडपणे सुरु करण्यात यावी जेणे करून महाराष्ट्र राज्यातील नदी संवर्धन होऊन त्या त्या भागात सुबकता होऊन नैसर्गिक समतोल राखला जाईल अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ गो. ढाकणे यांनी निवेदन देत केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत