राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त राहुरी येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सन्मान केला. ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त राहुरी येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सन्मान केला.
माजी मंत्री कर्डिले यांनी सर्वांना पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला व नवीन वर्षाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डीले म्हणाले की, राजकारण पूर्वी सारखे राहिले नाही.मात्र, आता पुढारी होणे सोपे झाले. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली. पण गुणवत्तेला महत्व आहे. त्यासाठी स्वतःच कर्तुत्व महत्त्वाच आहे. जो काम करतो त्याच्याकडून चूक होत असते.असे माजी मंत्री कर्डिले यावेळी म्हणाले.
यावेळी प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीयातील सर्व पञकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी दादा पाटील सोनवणे, सुरशिंगराव पवार, सुभाषराव गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र म्हसे, रभाजी सुळ,अनिल आढाव, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ पारख, भाजप शहराध्यक्ष राजेंद्र उंडे,उद्योजक भैय्यासाहेब शेळके, नयन शिंगी, सचिन मेहेञे, गणेश खैरे, उमेश शेळके,विक्रम गाढे,सुजय काळे,नारायण धोंगडे,अजित डावखर, दिपक वाबळे, उमेश शेळके, स्वीय सहायक अमोल धाडगे, सुनील देशमुख आदि यावेळी उपस्थितीत होते. पत्रकारांच्यावतीने राजेंद्र वाडेकर व विलास कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत