देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी सन्मान

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चाच्यावतीने  पत्रकार दिनानिमित्त देवळाली...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चाच्यावतीने  पत्रकार दिनानिमित्त देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.


 बागायत पीक सोसायटी येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे , नगरसेवक सचिन ढुस, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे , माजी चेअरमन शहाजी कदम , सोपानराव भांड, सोपान शेटे ,दिलीप मुसमाडे ,संजय मुसमाडे, सचिन कोठुळे , मनोज शिंदे, भीमराज मुसमाडे, सचिन सरोदे, नामदेव चव्हाण, दिगंबर पंडित, वसंत मुसमाडे, उमर इनामदार, भाऊसाहेब वाळुंज, चेतन कदम, रवींद्र दळवी, नगरसेविका संगीता चव्हाण, उर्मिला शेटे, सुजाता कदम आदी उपस्थित होते.


साई प्रतिष्ठानच्यावतीने देवळाली प्रवरा बाजार तळ येथे सुरू असलेल्या साई पारायण सोहळ्यात शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त गौरव करण्यात आला. यावेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, साई प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य, साईभक्त व पत्रकार बांधव उपस्थित होते.


देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात बाळशास्त्री जांभेकरांची जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.



यावेळी मुख्याध्यापक अकोलकर विनोद, उपमुख्याध्यापक आल्हाट सुधाकर,  पर्यवेक्षक काळे नानासाहेब, उपशिक्षक कडूस  सर, कुळधरण सर, ढोकणे सर, भाकरे सर, तातळे सर, झंझाड सर, चौधरी सर, वेताळ सर, दरोडे मॅडम, कोरडे मॅडम, पंडित मॅडम,पारधे भाऊसाहेब आदि उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुधाकर कराळे होते प्रास्ताविक अकोलकर सर व सूत्रसंचालन संपत ढोकणे यांनी केले तर आभार आल्हाट सर यांनी मानले.


राहुरी फॅक्टरी येथील दि.राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लि. संस्थेस पत्रकार दिनाच्या निमित्ताने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे,डॉ.विलास पाटील, किशोर थोरात आदी याठिकाणी उपस्थित होते.

तर पत्रकार बांधवांच्या वतीने याठिकाणी जेष्ठ पत्रकार रफिकभाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत