कोपरगाव/वेबटीम:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांच्या आरोग्...
कोपरगाव/वेबटीम:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी शिंगणापुरवासियांनी तेथील सिध्देश्वर देवस्थानला साकडे घालुन भिमा संवत्सरकर व त्यांच्या सहका-यांनी अभिषेक घातला व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिंदे यांनी प्रास्तविक केले. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर त्यांनी समाजमाध्यमावर त्याबाबत माहिती देत आवश्यक त्या चाचण्या करून घेतल्या. आजवरच्या प्रत्येक संकटात त्यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगांव मतदार संघाबरोबरच अन्य आपत्तीग्रस्तांना मोलाची मदत केली, कोरोनाग्रस्तांवर संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातुन मोफत उपचारही केलेले आहे त्या जाणिवेतुन युवा नेतृत्वावर आलेले संकट हरण व्हावे अशी प्रार्थना सिध्देश्वरचरणी करण्यांत आली. याप्रसंगी सर्वश्री संजय तुळस्कर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, शेखर कु-हे, प्रमोद संवत्सरकर, नंदु शुक्ला, भाजपा जिल्हा ओबीसीचे उपाध्यक्ष दिपक राउत, माजी सरपंच अंकुश कु-हे आदि उपस्थित होते. शेवटी संजय तुळस्कर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत