ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप !

कोपरगाव/वेबटीम:-   तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल (...

कोपरगाव/वेबटीम:-



 तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल ( दादा ) टेके पाटील यांच्या स्मरणार्थ कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना कडाक्याच्या थंडीत त्यांच्या फडात जाऊन उबदार कपड्यांचे ( कानटोपी )  सामाजिक बांधिलकीतून रविवारी ( दि. १६ ) वाटप केले. 



   यावेळी प्रा. डॉ. रवींद्र जाधव म्हणाले, राहुल दादांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची नेहमीच तळमळ असायची परंतु, गेल्या आठ महिन्यापूर्वी कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. मात्र, सामाजिक कार्यातून त्यांच्या स्मृती चिरंतर राहाव्यात यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सद्या कडाक्याची थंडी वाढली आहे. त्यामुळे चिमुकल्या पासून वयोवृद्ध पर्यंत सर्वांना हुडहुडी भरली आहे. अशातच उघड्यावर प्रपंच असलेल्या कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उब देण्याच्या धडपडीतून हा सामाजिक तितकाच भावनिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय निळे, बाळासाहेब गोर्डे, पत्रकार रोहित टेके, मधुकर सोनवणे, अशोक निळे, सोमनाथ गोंडे, सूरज टेके, अभिषेक टेके, साईराज टेके, अनुराग टेके, रामकृष्ण टेके, किरण टेके यांच्यासह ऊसतोड मजुरांचे कुटुंबीय तसेच चिमुकले मोठ्या संख्यने उपस्थित होते.

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत