कोपरगाव / प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह, लायन्स क्लब, लिनेस क्लब व लिओ क्लब ऑफ ...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह, लायन्स क्लब, लिनेस क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथे सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठोळे उद्योग समूहाचे संचालक राजेश ठोळे यांनी दिली.
या शिबिरामध्ये श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, सल्ला तसेच आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जाणार असून, प्रामुख्याने मेंदू, हृदयरोग, हाड, नेत्ररोग, दंतविकार आदी आजारांवर उपचार व शस्रक्रिया सुविधा उपलब्ध असणार आहेत.
याशिवाय बीपी, शुगर, ईसीजी तपासणी, मोफत औषधे आणि गरज पडल्यास 2 डी इको, एन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास शस्रक्रिया व उपचार मोफत असणार आहे, अशी माहिती श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक प्रसाद कातकडे यांनी दिली. तरी या शिबिराचा कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील गरजूंनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी आणि व्यक्तींनी रक्तदान शिबिरात सहभागी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन लायन्स क्लब कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत