राहुरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असलेल्या पुर्णाकृती पुतळ्याजवळील असलेल...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असलेल्या पुर्णाकृती पुतळ्याजवळील असलेले रॅम्प दुरुस्ती व अंबारीची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी तहसीलदार एफ.आर.शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, डॉ तनपुरे कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा स्मारक असून या ठिकाणी पूर्णता दयनीय अवस्था झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ज्या रॅम्पव्दारे वर जातो तो रॅम्प मोठया प्रमाणात हालत आहे व खराब झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही अपघात होण्याची शक्यता असून पुतळयाची विटंबना देखील होवू शकते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अंबारी बसवावी व तात्काळ पुतळ्याच्या रॅम्पची दुरुस्ती करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनात दिला आहे. या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व तनपुरे कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.एन.सरोदे यांना देण्यात आली आहे.
यावेळी वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा संघटक निलेश जगधने, राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, जिल्हा सहसचिव बाबासाहेब साठे, एकलव्य आदिवासी सेना तालुकाध्यक्ष पोपट शेलार, वंचित देवळाली प्रवरा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, युवक तालुकाध्यक्ष अक्षय दिवे, संदीप कदम, नंदू उल्हारे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत