देवळाली/वेबटीम:- अहंमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा येथे रविवार दि . १३/०२/२०२२ रोजी महाव...
देवळाली/वेबटीम:-
अहंमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा
येथे रविवार दि . १३/०२/२०२२ रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या मेळाव्यास एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातून एकूण ९ विद्यार्थ्यांची आय सी आय सी आय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी निवड करण्यात आली .
य निवड प्रक्रियेसाठी आय सी आय सी आय बँक तसेच एन एन आय टी -आय एफ बी आय लिमिटेड नाशिक यांचे अधिकारी उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ .स्वाती हापसे, प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा . मुर्तडक पी . एस . ,तसेच सदस्य साळवे . आर. आर . प्रा. गडाख जि .व्ही. प्रा शेख टी. एस . प्रा. राऊत जि. बी .प्रा. खिलारी बी .टी. यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत