सो चुहे खाकर बिल्ली चली हज को अशी राष्ट्रवादीची गत- आरिफ कुरेशी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सो चुहे खाकर बिल्ली चली हज को अशी राष्ट्रवादीची गत- आरिफ कुरेशी

कोपरगाव प्रतिनिधी:-             दहशतवादी कामात सहभागी असणाऱ्यांशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडी...

कोपरगाव प्रतिनिधी:-

           दहशतवादी कामात सहभागी असणाऱ्यांशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ कोपरगाव राष्ट्रवादीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनात आमदार काळे यांना आपण नक्की काय भूमिका मांडतोय याचाच गोंधळ उडालेला असल्याने गैरव्यवहारात अटक झालेल्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आंदोलन करून सत्ता द्या म्हणणे म्हणजे आधीच झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं असा त्यांचा प्रकार आहे अशी टीका माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी आमदार काळे यांच्यावर केली आहे.

केंद्राने अशा कारवाया करण्याऐवजी विकासाचे काम करावे असे सांगणारे आमदार काळे यांनी आपणच करत असलेल्या जाहिरातिसाठी किती वापर केंद्राच्या योजनांचा सुरू आहे हे बघावे.केंद्राच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीतून कोपरगाव मतदारसंघात पाणी योजना मंजूर झाल्या आहेत,नितीन गडकरी साहेब यांनी निधी दिलेल्या 752 जी महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करणारे आमदार काळे यांना तो विकास केंद्राचा आहे हे ठाऊक नाही का.? पंतप्रधान आवास योजना,अनेक पूल,रस्ते हे केंद्रीय निधीतून होत असतांना त्यांचे नारळ फोडायला जातांना आमदार काळे यांनी अभ्यास करून मग जात जावे.आपली निष्क्रियता झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा जे गैरप्रकार सध्या सुरू आहेत त्यावर आमदार काळे यांनी बोलावे.

एकही ठोस काम राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार काळे यांना आजवर करता आलेले नाही याचे शल्य त्यांच्या मनाला बोचत असणार त्यामुळे त्यांनी आता केंद्राच्या नावाने बोट मोडायला सुरुवात केली आहे.जनतेत संभ्रम पसरवून सत्य लपणार नाही व चुकीच्या गोष्टींचे समर्थन करून सत्ता मागणे म्हणजे काळेंच्या मनात नवाब मलिक यांच्या बद्दल सहानुभूती नाही तर फक्त सत्तेसाठी नवाब मलिकांच्याही कारवाईचा वापर करण्याचा विचार आहे.यावरूनच सगळा कारभार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे असा टोला कुरेशी यांनी लगावला आहे.

कोपरगाव प्रतिनिधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत