आगामी निवडणूका आरपीआय स्वबळावर लढविणार :- आरपीआय आंबेडकर गट राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आगामी निवडणूका आरपीआय स्वबळावर लढविणार :- आरपीआय आंबेडकर गट राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे

  राहुरी/वेबटीम:- आगामी जिल्हा परिषद -पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका आरपीआय आंबेडकर गट पूर्णताकदिने स्वबळावर लढविणार असून कार्यकर्त्यांनी...

 राहुरी/वेबटीम:-


आगामी जिल्हा परिषद -पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका आरपीआय आंबेडकर गट पूर्णताकदिने स्वबळावर लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिला आहे.

 मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यासमवेत अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. 


 यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे म्हणाले की, आरपीआय आंबेडकर गटाची प्रत्येक तालुक्यात मोट बांधून कार्यकर्त्यांची संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घ्या.सर्व जाती धर्मातील घटकांना एकत्र करून सर्वसामान्य व्यक्तीस आपला पक्ष उमेदवारी देण्यास बांधील राहील. आगामी सर्व निवडणुका आरपीआय आंबेडकर गट पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे निकाळजे म्हणाले. गट-तट न करता एकदिलाने काम करून नगर जिल्ह्यात एक आदर्शदायी काम व्हावे अशी अपेक्षा श्री.निकाळजे यांनी व्यक्त केली.


 जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे की, दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तळागाळातील कार्यकर्त आरपीआयशी जोडले जात आहे. निश्चित एक चांगल्या प्रकारे ताकद नगर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.त्यामुळे येत्या निवडणूकित आपल्या पक्षाचे सर्व ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.


 यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत दारोळे, संपर्कप्रमुख रोहित आव्हाड , दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, पँथर तानाजी मिसळे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, जिल्हा कार्याध्यक्ष पापाभाई बिवाल, राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे,  नगर शहराध्यक्ष संदीप वाघमारे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत