ऊस वाहणारा डबल ट्रेलरमुळेभीषण अपघात; तिघांनी गमावला जीव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऊस वाहणारा डबल ट्रेलरमुळेभीषण अपघात; तिघांनी गमावला जीव

 राहुरी :  वेबटीम    सध्या ऊसतोडणी हंगाम वेगात सुरू असल्याने ऊस वाहतूकिला देखील वेग आला आहे. परंतु, ही वाहतूक करताना ट्रॅक्टरला दोन दोन टेलर...

 राहुरी :  वेबटीम   


सध्या ऊसतोडणी हंगाम वेगात सुरू असल्याने ऊस वाहतूकिला देखील वेग आला आहे. परंतु, ही वाहतूक करताना ट्रॅक्टरला दोन दोन टेलर लावून ऊस वाहिला जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी अनेकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात जीव गमावले असताना  श्रीगोंदा तालुक्यात आज पहाटे तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
श्रीगोंदे तालुक्यात उसाच्या ट्रॉलीला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन तरुण जागेवरच  ठार झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे. राहुल आलेकर,केशवराव सायकर, आकाश खेतमाळीस ही मयतांची नावे आहेत. मृत तरुण हे सर्व 18 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती पुढे येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत