राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरात सामाजिक , धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शि...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरात सामाजिक , धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवार 15 फेब्रुवारी ते शनिवार 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान भक्ती-शक्ती कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिली.
शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा कीर्तन महोत्सवात नामांकित कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ज्ञानेश्वरीताई महाराज बागुल(नाशिक), 16 फेब्रुवारी रोजी दिपक महाराज देशमुख(सुगांवकर), 17 फेब्रुवारी रोजी कांचनताई महाराज जगताप(नाशिक)18 फेब्रुवारी रोजी विश्वनाथ महाराज वारिंगे(अंबरनाथ) तर 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता उद्धव महाराज मंडलिक(नेवासा) यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळा व महाप्रसाद वाटप होणार आहे. तसेच शनिवारी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे आदिनाथ कराळे यांनी सांगितले.
दत्ताञय दरंदले, गोपालकृष्ण रत्नपारखी, गणपत गव्हाणे,नंदकिशोर काळाणे,शिवाप्पा कपाळे आदींच्या हस्ते संतपुजन तर गणेश दादा भांड, गोपाळ शिंदे,शिवाजी सांबारे,प्रशांत काळे,युवराज लहांगे,सचिन मुसमाडे आदींच्या महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.या महोत्सव यशस्वीत्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्ती, नागरिक, वारकरी संप्रदायातील मंडळी, ग्रामस्थ व शिवबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.भक्ती-शक्ती कीर्तन महोत्सवाचे आयोजन वृंदावन काँलनी, श्रीरामपूर राहुरी फँक्टरी रोड या ठिकाणी होणार आहे.परीसरातील भाविकांनी भक्ती-शक्ती कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत