देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फौंडेशन आयोजित प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवळाल...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फौंडेशन आयोजित प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवळाली प्रवरा येथील युवा नेते अविनाश मुसमाडे यांच्या युवा संकल्प चॅलेंजर संघाने विजेतेदपद पटकावून 'डीपीएल २०२२'चषकाचा मानकरी ठरला आहे.
देवळाली प्रवरा येथे गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट स्पर्धां भरविल्या जात नसताना सत्यजित कदम फौंडेशनचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित देवळाली प्रवरा प्रीमियर लीग(टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भव्य स्वरूपात भरविली. यामध्ये ८ संघानी सहभाग नोंदविला होता. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदमयांच्या मार्गदर्शनाखाली व प्रसिद्ध उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांच्या नियोजनाअंतर्गत भरविण्यात आलेल्या या स्पर्धेस क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान रविवारी अविनाश मुसमाडे यांच्या युवा संकल्प चालेजर व सचिन ढूस यांच्या त्र्यंबकराज इलेव्हन या संघात अंतिम सामना पार पडला. अतिशय रंगतदार सामन्यात युवा संकल्प चालेन्जर संघाने बाजी मरून देवळाली प्रवरा प्रीमियर लीग चक पटकाविला आहे. ३१ हजार रुपये व चषक असे बक्षीस युवा संकल्प चॅलेजरला प्रदान करण्यात आले. द्वितीय बक्षीस २१,००० रुपये व चषक सचिन ढूस यांच्या त्र्यंबकराज इलेव्हन संघास तर शशिकांत खाडे, प्रशांत कोठुळे, रामेश्वर तोडमल व ऋषिकेश उंडे यांच्या जय हिंद संघास ११ हजार तर भारत शेटे यांच्या हेरंब इलेव्हन संघास ७ हजर रुपयांचे चतुर्थ बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी मन ऑफ द मच नितीन गायकवाड, उत्कृष्ट फलंदाज ओम राहिंज, उत्कृष्ट गोलंदाज अक्षय कदम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गजानन कोह्कडे, उत्कृष्ट यष्टिरक्षक गोविंद खवडे, उत्कृष्ट झेल अक्षय दळवी यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस माजी आ.तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे होते. यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, मुख्याधिकारी अजित निकट, सौ.प्रीतीताई कदम, सुजाता कदम, संगीता चव्हाण, उर्मिला शेटे, सुधाकर कदम, शहाजी कदम, अजित चव्हाण, वसंत कदम,बाळासाहेब आढाव, नयम शिंगी, सुधीर टिक्कल, भीमराज मुसमाडे, सागर खांदे, संदीप कदम, नयन शिंगी,मोहसीन शेख, डॉ.शेकोकार, डॉ,वीर, डॉ.शेख, डॉ.नेहे, डॉ. कोठुळे, राजेंद्र चव्हाण, डॉ.आप्पासाहेब चव्हाण आदिसंह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वितेसाठी सचिन कोठुळे, मंगेश ढूस, चेतन कदम. रविंद्र दळवी, दादा मुसमाडे, ओमकार लांडे, रविकिरण ढूस, अतुल कदम आदींसह सत्यजित कदम फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केले तर आभार सचिन ढूस यांनी मानले.
बक्षिसातील ११ हजार रुपये हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी
देवळाली प्रवरा प्रीमियर लीग स्पर्धेत अविनाश मुसमाडे यांच्या युवा संकल्प चॅलेंजर संघाने प्रथम ३१ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले असता या बक्षीस रकमेतून ११ हजार रुपये देवळाली प्रवरा शहरातील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी दिली आहे. धार्मिक कार्यात मुसमाडे यांनी मोठे योगदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२० फेब्रुवारी पासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा
देवळाली प्रवरा प्रीमियर लीग स्पर्धेत अनेक स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले. याच खेळाडूंच्या आग्रहास्तव शिवजयंतीचे औचित्य साधून २० फेब्रुवारी २०२२ पासून जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार असून यातील प्रथम विजेत्या संघास १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले. या स्पर्धेची कदम यांनी घोषणा करताच खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत