राहुरी(वेबटीम):- राज्यात मानाचा समजला जाणारा यावर्षीचा ‘छत्रपती’ पुरस्कार वितरण सोहळा लवकरच राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर...
राहुरी(वेबटीम):-
राज्यात मानाचा समजला जाणारा यावर्षीचा ‘छत्रपती’ पुरस्कार वितरण सोहळा लवकरच राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते आयोजित केला जाणार आहे. या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपल्या कार्याचे प्रस्ताव आठ दिवसांच्या आत छत्रपती प्रतिष्ठाण, उंबरे ता. राहुरी येथे कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून उंबरे येथे छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने ‘छत्रपती’ पुरस्कार देवून गौरव केला जातो. प्रशासकीय, सहकार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा, कृषी, महिला सबलीकरण, आदर्श सरपंच, पत्रकारीता आदी क्षेत्रात दिशादर्शक काम करणार्या व्यक्तींचा छत्रपती पुरस्कार देवून गौरव करण्यात येत असतो. दरवर्षी राज्यातील मंत्री महोदयांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न केला जातो.
दोन दिवसांपुर्वी प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्यांच्या झालेल्या बैठकीत लवकरच यावर्षीच्या छत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आठ दिवसांत प्रस्ताव बोलावून, त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कारार्थींची घोषणा होऊन कार्यक्रमाचेही रुपरेषा जाहीर केली जाणार असल्याचे प्रा. रामकृष्ण ढोकणे, विलासराव ढोकणे, दीपक पंडित, विद्या करपे, विलासराव गरुड, प्रा. जालिंदर दुशिंग, संदीप ढोकणे, लक्ष्मण पटारे, सचिन शेजूळ, शरद वाघ, शरद ढोकणे, गोरक्ष ढोकणे, गणेश ढोकणे, राहुल पाटील, गणेश तोडमल, गणेश अलावणे, दत्ता पवार, आकाश साबळे, अक्षय जरे, दत्ता बारवेकर, गणेश दुशिंग, मुन्ना डेंगळे, सागर भवार, प्रविण गायकवाड, संदीप गायकवाड, सोपान ढोकणे यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत