कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरातील अत्यंत रहदारी असणारा संभाजी महाराज पुतळा - गोकुळनगरी - टाकळी नाका (इंदिरा पथ) रस्त्याचे काम कोपरगाव पालिका क...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहरातील अत्यंत रहदारी असणारा संभाजी महाराज पुतळा - गोकुळनगरी - टाकळी नाका (इंदिरा पथ) रस्त्याचे काम कोपरगाव पालिका कधी करणार, असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी विचारला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी नगराध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत पंचायत समिती इमारत, ठोळे निवास ते आठरे बंगला या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. त्यात हा रस्ता फक्त तहसील पर्यंत केला असून, पुढील रस्ता अर्धवट ठेवला आहे. यामुळे शहरवासियांना नाहक धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यातून अनेक नागरिकांना श्वसनाचे आजारही जडले आहेत. तसेच शहराला जोडणारा बेटनाका - तांडेलबंगला - सोमय्या कॉलेज गेट ते मौनगिरी (छोटा पूल) या रस्त्यालाही मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिकेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी आणि नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी पाटील यांनी पालिकेकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत