सात्रळ/वेबटीम:- पंचक्रोशीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे अपघातास निमंत्रण होत आहे. रस्त्यांवरील उखडलेली खडी, त्यामुळे जागोजागी प...
सात्रळ/वेबटीम:-
पंचक्रोशीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे अपघातास निमंत्रण होत आहे. रस्त्यांवरील उखडलेली खडी, त्यामुळे जागोजागी पडलेले खड्डे, साईड पट्टया भर नसल्यामुळे पडलेल्या कपारी असे चित्र कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना आढळत असून या रस्त्यावरून जाणारे येणारे निमूट्पणे त्रास व मनस्ताप सहन करत आहेत. सोनगाव स्टॅन्ड ते एरिगेशन बंगला रोड, सात्रळ तांभेरे रस्ता, सात्रळ चौक ते पाथरे रस्ता, असे परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब असून या पूर्वीही विविध पक्षकार्यकर्तांनी आप आपल्या पक्षश्रेष्टींना तसेच लोकप्रतिनिधीना या बाबद तक्रार करूनही या कडे दुर्लक्ष होत आहे. यातील काही रस्त्यांसाठी निधी ही मंजूर झाला असूनही रस्तेदुरुस्ती चे कामे सबंधीत अधीकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणा मुळे अद्याप सुरु झाले नाहीत. सोनगाव स्टॅन्ड ते एर्रीगेशन बंगला शिवरास्त्याने परिसरातील तसेच निंभेरे, झरेकाठी अश्या गावांकडे जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी रोजची वर्दळ असून समोरून एखादे मोठे वाहन आले तर जीव मुठीत धरून क्रॉसिंग करावे लागते. तसेच सात्रळ तांभेरे रस्ता हा तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा वर्दळीचा व महत्वाचा रस्त्यांची ही दयनीय अवस्था असून रस्त्यातील खड्ड्यांमुळे पादचारी तसेच वाहन चालकांना या रस्त्यांवरून जाताना मनस्ताप सहन करावा लागतो. उखडलेल्या खडीमुळे पडलेल्या खड्ड्यातुन गेल्यामुळे अनेक वाहनांचे दुरुस्तीखर्च वाहनधारकांना सोसावा लागत असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत