ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करणार का? :- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करणार का? :- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव नगर पालिकेच्या नूतन इमारतीच्या जुन्या कंपाऊंड वर बांधकाम करणारे ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दा...

कोपरगाव/वेबटीम:-




कोपरगाव नगर पालिकेच्या नूतन इमारतीच्या जुन्या कंपाऊंड वर बांधकाम करणारे ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का ? अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

कोपरगाव नगर पालिकेची नवीन इमारत झाली पहिला मजला दुसरा मजला आमच्याच प्रयत्नातून झाला यावरून श्रेय वाद रंगला इमारती समोर  गार्डन करिता निधी आला त्याच प्रमाणे विद्यमान आ आशुतोष काळे यांनी नवीन इमारतीच्या कंपाऊड करीत ६८ लाख ९१ हजार रुपयांचा भरघोष निधी उपलब्ध करून दिला नवीन इमारतीला साजेसे कंपाऊंड होईल असे वाटले 



नगर पालिकाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी वाजत गाजत उदघाटन पार पडले मात्र तीन चार दिवसांपूर्वी ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंपाऊंड चे काम सुरू केले मात्र नवीन कंपाऊंड बांधण्या ऐवजी जुन्या कामावर विटा सिमेंट ने काम सुरू केले बऱ्याच प्रमाणात काम देखील झाले मात्र ही बाब लक्षात आल्या नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय मांडला आता हे जुने - नवीन बांधकाम आज तातडीने काढून घेतले 

नुकतेच आ आशुतोष काळे यांनी विकास कामाच्या तक्रारी असल्यास काळवाव्यात असे सांगितले त्याच प्रमाणे मागील पदाधिकारी यांच्या काळात नित्कृष्ठ विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती अनेक  विकास कामाच्या तक्रारी झाल्या मात्र कोणत्याच ठेकेदारांची काळी यादी प्रसिद्ध झाली नाही

आता प्रमाणे तक्रारी नंतर कंपाऊंड चे बांधकाम पाडले  मात्र तरी देखील दिवसा ढवळ्या जुन्या कामावर नवीन काम करून लाखो रुपयांच्या निधीवर दरोडा टाकणाऱ्या ठेकेदार, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर मुख्याधिकारी गुन्हा दाखल करणार का ? या कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करणार का? 

आपल्या कडे कुंपणच शेत खाते अशी म्हण आहे मात्र कोपरगाव नगर पालिकेचे सत्तर लाख रुपयांचे कुंपण खाणारावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत