राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व इतर सहा गावांची पिण्याच्या पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व इतर सहा गावांची पिण्याच्या पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की ब्राह्मणी व इतर गावांच्या नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत समावेश करण्यात आला होता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची समक्ष भेट घेत पाठपुरावा केला होता सदरील योजना याआधी राष्ट्रीय पेयजल मधून मंजुरी मिळालेली होती त्यात प्रतिव्यक्ती 40 लिटर पाण्याची तरतूद होती आता जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याची तरतूद करण्यात आलेली असून योजनेला जी आय पाईप समावेश आहे या योजनेचा लाभ ब्राह्मणी चेडगाव सडे पिंप्री अवघड कुक्कडवेढे मोकळ ओहळ या गावातील नागरिकांना होणार असून वाड्या-वस्त्यांवरही शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा होणार आहे योजनेत जीआय पाईप असल्याने पाण्याच्या चोरी होण्याचे प्रकारही थांबणार आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये योजनेचे काम हाती घेण्यात आलेले आहे या संबंधीचे प्रस्ताव मंत्रालयात दाखल करण्यात आले होते काही योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे लवकरच कार्यारंभ आदेश होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले जल जीवन मिशन अंतर्गत योजनांसाठी तालुका जिल्हा व मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्यांच्या विविध बैठका घेण्यात आलेल्या होत्या येणाऱ्या त्रुटी दूर करत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याने प्रशासकीय मान्यता मिळविण्यात अडचणी आल्या नाही विधानसभा निवडणुकी दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत