राहुरीतील' त्या' दोन युवराजांच्या लॉंचिंगची तयारी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील' त्या' दोन युवराजांच्या लॉंचिंगची तयारी!

  राहुरी/विशेष प्रतिनिधी:- राहुरी नगरपरिषदेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात भाजपच्या वतीने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या धर्तीवर दोन्ही प...

 राहुरी/विशेष प्रतिनिधी:-



राहुरी नगरपरिषदेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात भाजपच्या वतीने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या धर्तीवर दोन्ही पक्षांकडून अनेक नवे चेहरे निवडणुकीत पहायला मिळणार आहे. त्यात तनपुरे घराण्यातील तिसर्‍या पिढीचे आणखी एक वारसदार हर्ष अरूण तनपुरे यांची राजकीय एन्ट्री होण्याची शक्यता आहे.  नगरपालिकेत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणताना ‘नगराध्यक्ष’ पदावर हर्ष यांच्या राज्याभिषेकाचीही राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. तर, प्रतिक चाचा तनपुरे या युवा चेहर्‍याला तरुणांची मते आकर्षित करण्यासाठी भाजपकडून लाँच केले जाणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे.



   राहुरी नगरपालिकेची सत्ता माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात आहे. नामदार तनपुरेंनी आपली राजकीय वाटचाल नगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू केली आहे. त्यावेळी चाचा तनपुरेंना अस्मान दाखवत ते  नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. 21 पैकी तनपुरेंना 15 जागा मिळाल्या होत्या. दमदार नेते विजय डौले यांनाही धक्कादायक पराभव पहावा लागला होता.  कारखान्याचे माजी चेअरमन स्व.रामदास पा. धुमाळ यांचे नातू मंदार धुमाळ यांचा राजकीय प्रवेशही हुकला होता. त्यांनाही या निवडणुकीत पराभव दिसला होता.

 आता मात्र पुन्हा निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी प्रभागांची रचना सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांतील इच्छूक आपल्या राजकीय सोयीसाठी आपल्याला हवे आणि नको असलेल्या मतदारांची उचलबांगडी करणार आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी ‘वरून’ दबावही आणला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच रंगतदार ठरणार्‍या राहुरीच्या निवडणुकीत युवा चेहरे आपला ठसा उमटविणार आहेत. यामध्ये अनेकांचा राजकीय श्रीगणेशा होणार आहे. त्यात,ना. तनपुरे यांचे चुलत बंधू हर्ष तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे. ना. तनपुरे यांचे दुसरे चुलत बंधू युवराज सुधाकर तनपुरे हे खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत. आता हर्ष अरूण तनपुरेंना राहुरीच्या नगरपालिका निवडणुकीत पुढे आणले जाणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा योग जुळून आला तर नगराध्यक्ष पदावर हर्ष तनपुरे हे विराजमान झाल्याचे दिसणार आहे.

दुसरीकडे, भाजपाची ताकद कमी असली तरी चाचा  तनपुरेंना मानणारा वर्ग मोठा आहे. ते कोणत्याही पक्षात असो,  काही वर्ग त्यांना सोडत नाही. त्यात, खासदार सुजय विखे यांची ताकद त्यांना मिळणार आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले हे देखील चाचांसाठी अनुकूल आहेत. मात्र ही निवडणूक चाचा लढतील की नाही याबाबत साशंकता आहे. कदाचित, चाचा लढले तरी त्यांचे सुपूत्र प्रतिक चाचा तनपुरे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. राष्ट्रवादीकडे हर्ष तनपुरे तर भाजपाकडे प्रतिक तनपुरे हे युवा चेहरे मैदानात उतरणार आहेत. अर्थात हे उमेदवार समोरा समोर उभे राहण्याची चूक करणार नाहीत, मात्र या दोन युवानेत्यांचा राजकीय चंचू प्रवेश होणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत