राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडन्ट कामगार संघटनेचे राज्य कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्व...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडन्ट कामगार संघटनेचे राज्य कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुडके यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय सोशल लीडर सेवरत्न पुरस्कारने गौरवण्यात आले आहे.
गेल्या १५ वर्षापासून ज्ञानेश्वर सुडके हे सामाजिक व कामगार क्षेत्रात सातत्याने काम करत असून समाजातील आर्थिक बाजूने कमकुवत असलेल्या आजारी पेशंटलाला शासकीय तसेच खाजगी संस्था यांच्याकडून ऑपरेशन साठी निधी मिळवून दिला.तसेच कामगार क्षेत्रात बॉयलर अटेंडन्ट कामगारांसाठी संघटना उभी करण्यापासून ते सभासदांना न्याय देणे या गोष्टीत ते नेहमी पूढे असत.तसेच सामाजिक व कामगार क्षेत्रात असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय सोशल लीडर सेवारत्न पुरस्कार ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर , रमेश आव्हाड,महालक्ष्मी वानखेडकर, प्रकाश सावंत, मिनाक्षी गवळी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत