सात्रळ(वेबटीम) सात्रळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रधान मंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या "ड "यादीतील अपात्र लाभार्थीचे फेर सर्वेक्ष...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रधान मंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या "ड "यादीतील अपात्र लाभार्थीचे फेर सर्वेक्षणाची मागणीचे निवेदन भा ज पा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन ताठे यांनी केली असून या मागणीचे निवेदन राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना अपात्र लाभार्थीसह समक्ष भेटून दिले आहे.
सात्रळ येथील प्रधान मंत्री आवास योजनेतील घरकुलांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये एकूण 240 पैकी 172 लाभार्थी पात्र ठरले असून 68 अपात्र आहेत. या अपात्र लाभार्थी मधून काही लाभार्थी पात्रतेच्या निकर्षात बसत असून ही अपात्र घोषित केले आहेत. योग्य न्याय मिळण्यासाठी व पात्रतेच्या यादीत समावेश होण्यासाठी फेर सर्वेक्षनाची मागणीसाठी अपात्र लाभार्थीनी बीजेपी ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन ताठे यांचा नेतृत्वाखाली एकत्र येऊन या समंधी लढा चालू केला असून तातडीने न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर डुक्रे, सुधीर शिंदे, संतोष अनाप, अश्विनी शिंदे, नितीन सात्रळकर, सावळेराम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, भास्कर शिंदे, योगेश जाधव, नवनाथ कुळधरण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत