राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे १२ ते १९ फेब्रुवारी...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे १२ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान श्री. साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राहूरी कारखाना नजीक असलेल्या चोथे वस्ती येथील परिसरातील नागरिकांच्यावतीने शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान श्री साई चरित्र पारायण सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने दररोज सकाळी ७ ते १० यादरम्यान ग्रंथवाचन होणार आहे. दररोज सकाळी १० , दुपारी १२, सायंकाळी ७ व रात्री १० वाजता श्रींची आरती तसेच दररोज सायं ७ ते ८ या वेळेत प्रवचन सेवा संपन्न होणार आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व त्यानंतर ९.३० वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) काल्याचे जाहीर हरिकीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या पारायणास व्यासपीठ चालक म्हणून साई भक्त श्रीनिवास सहदेव, राहुरी तर हरिपाठ, काकडा व प्रवचन नेतृत्व सेवा ह.भ.प बाबा महाराज मोरे सेवा देणार आहेत. या सप्ताह साठी गणपती चौक भजनी मंडळ, शांती चौक मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ तसेच परिसरातील दानशूर अन्नदाते, गायनाचार्य, मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, साईभक्त भाविकांचे सहकार्य लाभाणार आहे.
पारायासाठी सर्व वाचकांना ग्रंथ पुरविले जाणार असून सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी भारत चोथे, दत्तात्रय मोरे, दीपक चोथे, अनिल थोरात, दिनेश चोथे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत