अमरावतीचे आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावरील शाई फेकीचा देवळाली प्रवरा नगरपालिका आवारात मुख्याधिकारी निकत यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अमरावतीचे आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावरील शाई फेकीचा देवळाली प्रवरा नगरपालिका आवारात मुख्याधिकारी निकत यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून निषेध

  देवळाली प्रवरा(वेबटीम) अमरावती राजपेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पद्धतीने बसवलेला पुतळा महानगरपालिकेने हटवला असता त्या...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)


अमरावती राजपेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पद्धतीने बसवलेला पुतळा महानगरपालिकेने हटवला असता त्याचा राग मानत ठेवत शिवप्रेमी भक्तांनी अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावर शाइफेक केली असता या घटनेचा देवळाली प्रवरा नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.


अमरावतीच्या भाजप खासदार नवनीत राणा यांच्या मतदार संघात  काही दिवसांपूर्वी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली राजपेठ उड्डाणपूलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत रित्या बसविला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेने कारवाई करत तो पुतळा तेथून हटवला होता. त्याचा राग मानत ठेवत शिवप्रेमी भक्तांनी अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावर शाइफेक केली.


या घटनेचा राज्यात सर्वत्र निषेध होत असताना देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आवारात मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून या घटनेचा निषेध केला.


यावेळी कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, बांधकाम विभागप्रमुख सुरेश मोटे, संभाजी वाळके आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत