सात्रळ/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील सात्रळ गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नामदार प्राजक्त दादा तनपुरे व युवानेते किरण कडू पाटील यांच्या मार्गद...
सात्रळ/वेबटीम:-
किरण कडू पाटील आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की, नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परिसरात तरुणांचे मोठे संघटन बांधावयाचे आहे. तरुण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आदरणीय पवार साहेबांकडे आकर्षित झालेले असून जातीयवादी शक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच कार्यकर्त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी पक्ष कटीबद्ध असल्याचे सांगितले. आपल्याला परिसरात मोठी ताकद नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मागे उभी करून पक्षाचे हात बळकट करण्याचे आवाहन किरण पाटील कडू यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी कडू यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. यात नरेंद्र कडू, हर्षल कडू, प्रशांत कडू, सचिन सिनारे, राजेंद्र कडू, कैलास पलघडमल, बाळासाहेब डुक्रे, हेमंत कडू, दत्तात्रय पलघडमल, रामा पवार, दिनेश पलघडमल, मनोज कडू, संतोष ब्राम्हणे, मुन्ना पवार, संजय कडू, राजेंद्र पलघडमल, आकाश पलघडमल, विजय पलघडमल, भाऊसाहेब पलघडमल आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आभार दत्तात्रय पलघडमल यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत