बाळासाहेब नवगिरे/पानेगांव- विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मला मोठ्या विश्वासाने खरवंडी गटात पाठविले होते अ...
बाळासाहेब नवगिरे/पानेगांव-
विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मला मोठ्या विश्वासाने खरवंडी गटात पाठविले होते असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी (खरवंडी ता. नेवासा) खरवंडी येथे १कोटी ९०लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच तथा मुळाचे जेष्ठ संचालक संजय जंगले हे होते.
यावेळी सभापती गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राजकारणात मला १०ते १५ वर्षाचा अनुभव होताच परंतु ज्यावेळी खरवंडी जिल्हा परिषद गटात उमेदवारी करत असताना मागील निवडणुकीत मोटारसायकल वरून गावा- गावात, वाड्या- वस्त्यावर फिरुन सर्वच पायाभूत सुविधां पासून हा गट विकासापासून कोसो दूर होता. खरवंडी गटा मध्ये एक असं गांव राहिलं नाही कि,काम सुरू नाही कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध करून विकास कामे झाली .काही ठिकाणी सुरु आहे. हे सर्व शक्य झालं तुम्ही तसेच जेष्ठ नेते गडाख साहेब यांनी दाखविलेल्या विश्वासाने शक्य झालं.उद्याचा जिल्हा परिषदवर भगवा फडकवविण्यासाठी आतापासूनच कामाला लागा यावेळी तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट असणार असून आठी गटात सेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास गडाख यांनी व्यक्त केला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना त्यांचा मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री समावेश केला खऱ्या अर्थाने तेथून तालुक्यात, जिल्ह्यात विकासाला चालना मिळाली.जवळपास तालुक्यात दिड हजार कोटी मागे होत असून काही प्रगतीपथावर असल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले.
यावेळी वाटापूरचे माजी सरपंच भिकाजी जगताप,मुळाचे संचालक संजय जंगले,नाथाजी पंडीत, जयवंत लिपाने, संभाजी मुरकुटे यांनी भाषणात सांगितले की, खरवंडी गटात झालेले रेकॉर्ड ब्रेक कामामुळे सुनिल गडाख हे खरवंडी गटात जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असून राज्यात विक्रमी मताने निवडून येणार असल्याचं सांगितलं.
कार्यक्रमासाठी चिंचबनचे सरपंच विठ्ठल शिंदे,किशोर जंगले, सिताराम औटी, बापूसाहेब कल्हापुरे, कैलास दरंदले,विजय कुर्हे, जालिंदर ढेरे,रौंदळ अण्णा, नामदेव फाटके, आप्पासाहेब ढेरे,राहुल मोटे,केशव शिंदे, सतिश मोटे, देविदास जगताप, अच्युतराव घावटे,विजय फाटके, प्रकाश उंदरे, अजित भोगे, पोलीस पाटील संदिप फाटके,मुळाचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, शंकरराव दरंदले निवृत्ती जंगले महेश सोनवणे, दिनेश जंगले अविनाश एळवंडे आदी सह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन राहुल मोरे प्रस्ताविक मुकंद भोगे आभार विजय फाटके यांना मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत