देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कान, नाक , घसा तज्ञ व जनरल फिजिशीयन डॉ.अनिरुद्ध केशव(उदयराव) ठोंबरे MS ENT(S...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कान, नाक , घसा तज्ञ व जनरल फिजिशीयन डॉ.अनिरुद्ध केशव(उदयराव) ठोंबरे MS ENT(SCH),PGDEMS, DIHM) यांच्या श्रीस्वामी क्लिनिक येथे रविवार दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत कर्णरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सध्या अनेक व्यक्ती कानाच्या विविध व्याधीने त्रस्त असून त्यावर योग्य निदान व मार्गदर्शन तथा उपचार व्हावे या हेतूने देवळाली प्रवरा येथील अनंत नागरी कॉम्प्लेक्स, देना(बडोदा) बँकेजवळ असलेल्या डॉ.अनिरुद्ध ठोंबरे यांच्या श्रीस्वामी क्लिनिक येथे मोफत कानाचे तपासणी शिबिर रविवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शिबिर होणार आहे.
या शिबिरात अनेकदा मागून आवाज दिलेला किंवा बोललेले न समजणे, बारीक आवाजात बोललेले न समजणे, अनेकदा समोरच्या व्यक्तीला मोठ्याने बोलायला सांगणे, बाजाराच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे न समजणे, कानातून शिट्टीसारखा आवाज येणे. टी.व्ही., मोबाईल आवाज मोठा करण्यास सांगणे, आवाजाच्या क्षेत्रात काम करावे लागणाऱ्या व्यक्तींना श्रवणदोष असण्याचे दाट शक्यता असते, ५० वर्षेपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीची नस कमजोर असल्याने बहिरेपणा याबाबत निदान व उपचार केले जाणार आहेत.
तसेच सवलतीच्या दरात मशिनद्वारे बहिरेपणा तपासणी Audiometry Test- २०० /- रूपयात (७५% सवलत) Hearing Aid (ऐकण्याचे मशीन) २५% सवलतीच्या दरात केली जाणार आहे.
तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.ठोंबरे यांनी केले आहे. आधिक माहितीसाठी 98608 55671 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत