कोपरगाव/वेबटीम:- कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्...
कोपरगाव/वेबटीम:-
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल,कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा - २०२२ आयोजन करण्यात आले
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून २१ वर्षांपासून शासकीय शिवजयंती उत्सव निमित्ताने शिवप्रेमींच्या सहभागातून चित्रकला,रांगोळी,बाल नाटिका अशा विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करुन लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचे विचार रुजविण्याचे कार्य निरंतर सुरू आहे.सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा करिता गट-अ (५ वी व ६ वी), गट-ब (७ वी व ८ वी), गट-क (९ वी व १० वी),गट-ड खुलागट या प्रमाणे गट तयार करण्यात आले होते गटातून सहभागी झालेल्या विध्यार्थ्याना आज खडकी येथील प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोळ बोलत होते.
या स्पर्धेत भारतीय टपाल विभागाचे पोस्टकार्ड आयोजकां कडून देण्यात आले होते पोस्टकार्डवर मजकूर लिहिण्याच्या बाजूला छत्रपती शिवाजीराजे अथवा शिवकालिन प्रसंग रंगीत रेखाटून त्यावर "शिवसंदेश" लिहिलेल्या पोस्ट कार्ड स्पर्धेत सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन
दिलीप बर्डे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हेमचंद्र भवर हे होते.
या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की आज आपण जे यशस्वी महापुरुष यांचा आदर्श घेतो त्यानी खडतर परिस्थतीतून वाटचाल करत यश प्राप्त केले मात्र विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर मेहनत घेतली पाहिजे यावेळी हेमचंद्र भवर यांनी शाळेस पुस्तके भेट दिली तर भवर आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचन लेखन छंद माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहेत असे म्हणाले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर कार्यक्रमास
माणिक कदम संतोष जाधव राहणे मॅडम वरुळे मॅडम आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत