देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्यावरील संत कदम माऊली पाणीवापर संस्थेस पाणी व्यवस्थापन समितीचा ५ लाख रुपयांचा पु...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्यावरील संत कदम माऊली पाणीवापर संस्थेस पाणी व्यवस्थापन समितीचा ५ लाख रुपयांचा पुरस्कार पुणे येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी व निवडक ग्रामस्थ उपस्थित होते
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राखमाजी जाधव म्हणाले, हा पुरस्कार सभासद व संचालकांसह पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून 'मिळाला असून सर्व सभासदांचा हा पुरस्कार आहे. नामदार जयंत पाटील यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले माऊली संस्थेने काटकसर करून सर्व
सभासदांचे हित जोपासून पारदर्शी कारभार केला आहे. सर्व सभासदांनी वेळेवर पाणी घेऊन पाणीपट्टी भरून संस्थेला वसुली करून दिली. त्याबद्दल संस्थेचे कर्मचारी गणेशराव जाधव, सचिव यांनी काटकसरी कारभार केल्याने व चेअरमन ज्ञानेश्वर जाधव यांच्या सहकार्यामुळेच संस्थेला हा बहुमान मिळाला. तर पाटकरी सतीशराव टेकाळे 'यांनी देखील संस्थेसाठी लक्ष देऊन शेतकऱ्यांना वेळेवर पाणी दिले. त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन होत आहे. याकामी उपविभागीय देवळाली शाखा क्रमांक मुसळवाडी दोन यांचे विशेष सहकार्य लाभले. व्ही. बी. निंबाळकर समन्वय प्रबंधक नाशिक, वाघालकर नाशिक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे जाधव यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत