राहुरी(वेबटीम):- मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील पाझर तलाव दुरुस्ती साठी सुमारे 2 कोटी 39 ल...
राहुरी(वेबटीम):-
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील पाझर तलाव दुरुस्ती साठी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत सदरील कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून यात 14 कामांचा समावेश आहे.
राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील पोहिचा पाझर तलाव साठी पंधरा लाख 79 हजार खडांबे बुद्रुक येथील तनपुरे मळा दहा लाख 75 हजार गंगापूर येथील गाव तलावासाठी सहा लाख 80 हजार कोपरे गाव तलावसाठी तीन लाख सहा हजार वांबोरी गावठाण येथील साठा बंधारा दोन लाख 12 हजार गुंजाळे येथील साठा बंधारा सात लाख 39 हजार आरडगाव येथील खडकी नाला साठा बंधारा नाला 10 लाख 65 हजार ताहराबाद येथील गावठाण सहा लाख 48 हजार पांगरमल खंडोबा वस्ती 44 लाख 99 हजार खोसपुरी नंबर 2 गावठाण पाझर तलाव दुरुस्ती 49 लाख 46 हजार बहिरेवाडी वाकी वस्ती साठा बंधारा 10 लाख दोन हजार इमामपूर गावठाण साठा बंधारा दुरुस्ती नऊ लाख 9 हजार पिंपळगाव माळवी भोपते पाझर तलाव दुरुस्ती 49 लाख 23 हजार पिंपळगाव माळवी लहारे वस्ती को प बंधारा तेरा लाख 82 हजार असे एकूण दोन कोटी 39 लाख 65 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सदरील काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.
पाझर तलाव दुरुस्ती झाल्यानंतर पाण्याच्या साठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे नमूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत