कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतप...
कोपरगाव प्रतिनिधी-
कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, जावेद शेख, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, ऋषिकेश खैरनार, विकि जोशी, गणेश लकारे, गणेश बोराडे, विजय शिंदे, श्याम ओढेकर, प्रकाश मोराडे, अनिल लचुरे, दिनेश संत, विजय शिदोरे, नगरपपरिषद अभियंता सुनील ताजवे, सहाय्यक अभियंता हर्षवर्धन सुराळकर, निलेश बुचकुले, ठेकेदार एस. के. येवले आदी उपस्थित होते.
रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ठेकेदारांनी काळजी घ्यावी. रस्त्यांसाठी निधी वारंवार मिळत नाही त्यामुळे होणारे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. त्यामुळे सुरु असलेल्या रस्त्यांची कामे नागरिकांच्या सूचनांचा आदर करून रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत गुणवत्ता राखण्यासाठी सबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दर्जेदार रस्ते तयार करून घेणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत