राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात देवळाली प्रवरा नगरपालिकेने बसवलेला 'आय लव देवळाली प्रवरा'हा सेल्फी पॉइंट नागरिकांच्या विरोधानंतर अवघ्या काही वेळातच हटविण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेने आज दुपारी राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आवारात 'आय लव्ह देवळाली प्रवरा' हा सेल्फी पॉइंट बसविला. याची माहिती राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तातडीने विरोध करून मुख्याधिकारी निकत यांना संपर्क करून सदरील सेल्फी पॉइंट तातडीने हटवा अशी मागणी केली.
त्यानंतर अगदी काही वेळातच हा सेल्फी पॉइंट हटविण्यात आला आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भवती आय लव यासारखे शब्द हे निश्चितच महारांजांचा अपमान करण्यागत असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आवारात हा सेल्फी पॉइंट बसविण्यासाठी तनपुरे कारखान्याची परवानगी घेतली नसल्याचे चर्चेतून समजते.
यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, प्रशांत काळे,सुनील विश्वासराव, विकी पंडित, कृष्णा शिवले, नागेश शेकडे, बंटी वाकचौरे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत