राहुरी (वेबटीम):- राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पाथरे खुर्द विविध सेवा संस्थेच्या पंच...
राहुरी (वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पाथरे खुर्द विविध सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने सर्वच १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवला तर विरोधी शेतकरी विकास मंडळाचा पुरता धुव्वा उडाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी धनराज महाजन यांनी हा निकाल घोषित केला आहे. त्यास संस्थेचे सचिव चंद्रभान पवार, मोहन बनसोडे, दिलीप भोसले आदींनी सहकार्य केले.
रविवारी पाथरे खुर्द सोसायटीच्या १२ संचालक पदाच्या जागांकरिता हि निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.१२ जागांकरिता २४ उमेद्वार निवडणूक रिंगणात उभे होते. रविवारी झालेल्या मतदार प्रकियेत ६९३ सभासदापैकी ६६७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी उशीरा मतमोजणी झाल्यानंतर जनसेवा मंडळाचे सर्वेसर्वा रखमाजी जाधव,रायभान काळे,बाळासाहेब जाधव, सागर जाधव, हारीभाऊ जाधव, दिनकर टेकाळे, पुरुषोत्तम टेकाळे, बाळासाहेब लोखंडे, रंगनाथ जाधव, इंदुबाई जाधव, मीरा बाई टेकाळे, पांडुरंग पठारे ह्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. तर ब्रम्हनाथ अश्रुबा पुरी हे निवडणुकीपूर्वी बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे जनसेवा मंडळाने १३ जागा प्राप्त करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.राञी या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. या प्रसंगी मार्गदर्शक रखमजी बन्सी जाधव म्हणाले की, सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्थेचे कामकाज हे सभासदांच्या हिताच्या केले जाईल. १3/0असा निकाल लागल्या नंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतीषबाजी करीत गुलांलाची उधळण केली.विजयी उमेदवारांना पेढे भरुन स्वागत केले.यावेळी झालेल्या विजयी सभेत मंडळाचे उपाध्यक्ष राजू भास्कर टेकाळे यांनी सांगितले की आपला संपूर्ण पँनल विजयी झाला याचा सुत्रधार रणछोडदास जाधवच आहेत.हा सज्जन शक्तीचा विजय आहे.
या विजयी सभेत प्रसंगी एकनाथ जाधव, राजेंद्र टेकाळे, राजेंद्र गावडे, रणछोडदास जाधव, मोहन टेकाळे, खंडेराव जाधव, रंगनाथ काळे, शांतीलाल टेकाळे, शंकर जाधव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र टेकाळे, विजय सखाहारी जाधव,हारिभाऊ खंडेराव जाधव,चांगदेव टेकाळे, विजय कोंडीराम जाधव,शेषराव जाधव,गंगाधर शिरसाठ, विष्णू शेलार, ज्ञानदेव पवार,अॅड. सचिन काळे ,श्रीधर जाधव, श्रीकांत जाधव, किरण जाधव, तुकाराम जाधव,अजित धुळे, गणेश जाधव, महेश टेकाळे, शांतीलाल जाधव, तानाजी लोखंडे, रामदास जाधव, इसाक शेख, सिद्धेश्वर जाधव, बाळासाहेब नाईक, शिवाजी जाधव ,अण्णासाहेब काळे ,प्रवीण गांगुर्डे,ज्ञानेश्वर जाधव, गोरक्षनाथ टेकाळे, शिवाजी जाधव, सोमनाथ जाधव, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..अभार रणछोडदास जाधव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत