वैद्यकीय अधिकारी डॉ.मासाळ यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैद्यकीय अधिकारी डॉ.मासाळ यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

  अहमदनगर(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांना...

 अहमदनगर(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांना निलंबित करावे या मागणीसाठी देवळाली प्रवरा येथील आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार भिंगारे व अन्य कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.



गेल्या काही दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील महिला पहाटच्यावेळी प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात आली असता तिला उपचारासाठी दाखल न करता हाकलून दिले होते .


त्यानंतर काही वेळातच ती महिला रस्त्यावर प्रसूती झाली. यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता आ.लहू कानडे व  माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार लहू कानडे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांचे निलंबन करावे असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदार व आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.


 दरम्यान आज सोमवारी देवळाली प्रवरा येथील आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली  कुमार भिंगारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. डॉ.मासाळ यांना  व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा कुमार भिंगारे यांनी दिला आहे.


या आंदोलनात कुमार भिंगारे यांच्यासह माऊली भागवत ,अंबादास इरले,दीपक पंडित ,रामेश्वर नवकार,सुयोग जगधने सहभागी झाले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत