कोपरगाव / प्रतिनिधी:- शालेय जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन सामाजिक ...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शालेय जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त सूर्यतेज संस्थेतर्फे भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती भारतीय टपाल विभागाच्या पोस्टकार्डवर मजकूर लिहिण्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज अथवा शिवकालीन प्रसंग रेखाटून त्यावर शिवसंदेश लिहिलेल्या पोस्टकार्ड स्पर्धेत सहभागी स्पर्धकांस सहभाग प्रमाणपत्र आज कोपरगाव शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळ प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक ४ येथे सामाजिक कार्यकर्ते शेख निसार शेख यांच्या हस्ते देण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांनी घडविलेल्या इतिहासाचे पुस्तक वाचन करणे गरजेचे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम खान व यास्मीन शेख यांनी निसार शेख यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन खान मुबश्शीर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद मुदस्सीर, शेख फहिमुन्नीसा, शेख नसीम, शेख अंजुम, सय्यद शबनम, कुरेशी दस्तगीर आदिंनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत